शशिकांत तांबे – देवळा प्रतिनिधी :
ऑक्टोबर २०२४ मध्ये अचानक कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात तसेच चांदवड – देवळा मतदार संघात मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले होते.
यामध्ये देवळा तालुक्यातील ३१, ५५१ बाधित शेतकऱ्यांच्या एकुण १४,३७८ हेक्टर क्षेत्राचे, तसेच चांदवड तालुक्यातील ४१,७६४ बाधित शेतकऱ्यांच्या ३२,७२१ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. त्याच प्रमाणे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एकूण १,८२,३७४ बाधित शेतकऱ्यांच्या १,०४,७९३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. यामध्ये प्रामुख्याने हाताशी आलेले कांदा, डाळींब , द्राक्ष, सोयाबीन, भाजीपाला,मका या प्रमुख पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. परंतु झालेल्या नुकसानीचे शासकीय यंत्रणेमार्फत तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना राज्य शासनामार्फत ऑक्टोबर २०२३ मध्ये झालेल्या नुकसानीची ३१,१० कोटी रुपये देवळा तालुक्यासाठी व ७१,३७ कोटी रुपये चांदवड तालुक्यासाठी,आसे एकुण १०२ कोटी ४७ लाख रुपये मंजूर करून अदा करण्यात आले असुन, संपूर्ण जिल्ह्यात १९३ कोटी ७ लाख मदत झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे चांदवड देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी बोलताना सांगितले..
Discussion about this post