यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने “गाथा सन्मानाची” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. मा. अजितदादा पवार, तटकरे साहेब आणि रूपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात डॉ. नेहा पडोळे, प्रा. सोनल देशमुख, समाजसेविका संगीता रुपणर, इंजिनियर शोभाताई मडावी, श्रेष्ठ रक्तदाता लताताई गुडदे, दुर्गाताई पटले, अंगणवाडी सेविका प्रतिभाताई भगत, आशा सेविका पूनम पारधी, महिला सफाई कर्मचारी मेघा कांबळे, पोलीस होमगार्ड आदी महिलांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हा निरीक्षक दीपांजलीताई गावित होत्या. यावेळी पक्षाच्या अनेक महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
🔹 नवनियुक्त पदाधिकारी:
✅ जिल्हा उपाध्यक्ष: रंजनाताई आडे, कविताताई पांढरकर
✅ आर्णी तालुका अध्यक्ष: पूजाताई ढाले
✅ बाबुळगाव तालुका कार्याध्यक्ष: कांताताई लाहे
✅ शहर संघटिका: सीमाताई ठोकळ
✅ शहर उपाध्यक्ष: सपना घावडे, सरिता आडे
✅ शहर सरचिटणीस: संध्या वानखडे, मालती गावंडे
कार्यक्रमास महिला जिल्हाध्यक्ष सुनयनाताई संजयराव, शहराध्यक्ष अबोलीताई देशमुख, पांढरकवडा तालुका अध्यक्ष भावनाताई नावाथे, यवतमाळ तालुका अध्यक्ष विद्याताई भोयर, संतोष भाऊ भोयर, संगीता जळीत, छायाताई ढेंगरे, सरिता आडे आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➡️ महिला सबलीकरण आणि सामाजिक सन्मानाचा संदेश देणारा हा सोहळा यशस्वी ठरला. 🎉
Discussion about this post