प्रतिनिधी :- गणेश जगताप
नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या कारची समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोशी जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात प्राजक्ता गिरीश गिरमे या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांचे पती आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक माहितीनुसार, वेग आणि चुकीच्या दिशेने वाहन चालवण्यामुळे हा अपघात घडला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
Discussion about this post