दौंड -काल,ता.11मार्च,रोजी चिऊ -माऊची जोडी धर्मवीर गड पेडगाव येथे स्मृती दिनाच्या निमित्ताने शौर्य स्तंभास मानवंदना देण्यासाठी आली होती.
दोन जुळ्या बहीणीचे रेकॉर्ड
ठाणे -डोंबवली येथील प्रेशा आणि रेशमी कदम या जुळ्या बहिणींनी वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत 100 गड किल्ले सर केले आहेत त्यांच्या या लहान वयात भटकंतीच्या विक्रमाची नोंद इंडियन बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद सुद्धा झालेली आहे.
कमी वयात 100 गड किल्ले सर करून नवीन रेकॉर्ड करणार
प्रेक्षा व रेशमी या जुळ्या बहिणींनी वयाच्या अडीच व्या वर्षीपासून गड किल्ले भटकंती सुरू केलेली आहे आतापर्यंत पावणे सहा वर्षात 98 गड किल्ले भटकंती केली आहे सहा वर्षे पूर्ण होण्याआधी 100 गड किल्ले सर करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या आई-वडिलांच्या सोबतीने त्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या 98 गड किल्ल्यामध्ये जास्तीत जास्त गिरीदुर्ग आहेत आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच साल्हेर किल्ला सुद्धा त्यांनी सर केलेला आहे. तसेच गड किल्ल्याबरोबर महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसुबाई शिखर चार वर्षाच्या असताना त्यांनी सर केले आहेत.
धर्मवीर गडावर येण्याचे विशेष कारण .
काल त्या धर्मवीर गडावर येण्याचे विशेष कारण म्हणझे प्रेशा आणि रेशवी ज्या गडांवर भटकंती करतात त्या गडावरील माती आणि दगड जमा करत आहेत..त्यांच्या आईवडिलांनी मध्ये चर्चा केली होती कि 100 व्या गडावर जाऊ तेव्हा 99 गडकिल्यांची माती तिथे घेऊन जाऊ आणि 100 व्या गडाची माती त्यात Mix करून 100 गडांची माती जे त्या दिवशी सोबत येणार त्यांच्या मस्तकी लावू..हे प्रेशा ने ऐकले होते , मध्ये जेव्हा मुल्हेर गडावर भटकंतीला गेलो होतो तेव्हा अचानक प्रेशा तिच्या बाबांना बोलली की बाबा आपण जी 100 गडकिल्यांची माती मस्तकी लावणार आहोत त्यात छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिले त्या गडावरील सुद्धा माती असली पाहिजे ना..तेव्हा अचानक हे ऐकून तिचे बाबा निशब्द झाले होते तेव्हा लवकरच धर्मवीरगड आणि तुळापूर ला येण्याचे ठरले..बलिदान स्फुर्तीदिन या विशेष दिवशी येण्याचे नियोजन करण्यात आले..
Discussion about this post