
जावली- प्रतिनिधी :- सुरेंद्र जाधव
छत्रपती श्री शिवाजी महाराज याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळीच्या खोऱ्यात महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयनामाईच्या तीरावर ग्रामदैवत श्री. बाळसिध्देश्वर आणि आई तुळजा भवानी माता याच्या छत्र छायेखाली वसलेले तेटली गाव आणि याच गावात गेली १५ वर्ष राजे शिवछत्रपती यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करत असून हे उत्सव समिती चे १६ वे वर्ष आहे..नोकरीधंद्या निमित्त मुंबई सारख्या मायावी नगरीत गेलेले तेटली गावचे तरुण कार्यकर्ते एकत्र येत २०१० साली त्यांनी छत्रपती श्री.शिवाजी महाराज याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोयना विभागात आपल्या गावात या कार्यक्रमाची सुरवात केली आणि मग पुढे जस जसे…कोयना सोळशी कांदाटी १०५ गाव समाज बांधव याचे आशीर्वाद मिळत राहिले ..ग्रामस्थांचे सहकार्य होऊ लागले आणि या कार्यक्रमाचे स्वरूप मोठे होत गेले मुलानमध्ये एकीची भावना निर्माण होऊन स्वाभिमान अंगात खेळू लागला..तर हळू हळू राजकीय नेते मंडळी देखील या सोहळ्याला हजेरी लावू लागली छत्रपती शिवाजी महाराज याचे १३ वे वंशज सातारा जावळीचे लोकप्रिय आमदार आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.श्री. शिवेद्रसिंहराजे भोसले यांचे देखील या सोहळ्याला गेली अनेक वर्ष आशीर्वाद मिळाले…एवढेच काय पण या कार्यक्रमाचा आदर्श घेऊन आज कोयना विभागात अनेक गावागावात शिवजयंती उत्सव देखील साजरे होऊ लागले ही मोठी आनंदाची बाब आहे..
सर्व मुले ग्रामस्थ आणि माता भगिनी एकजुटीने एकत्र येत हा छत्रपती श्री शिवाजी महाराज याचा शिवजन्मोत्सव मोठ्या थाटात विविध प्रकारचे कार्यक्रम राबवून साजरा केला जातो..
या मध्ये महाराजांची पालखीत बसवून हलगी वाद्य व फटाक्यांच्या आतषबाजी मध्ये वाजत गाजत नाचत थाही थाटात मिरवणूक काढली जाते याच दरम्यान तेटली शाळेतील मुलांचे डान्स लेझिम पथक देखील साजरे होते तर मिरवणूक पूर्ण झाल्यानंतर प्रमुख पाहुणे आणि ग्रामस्थ याच्या हस्ते पुतळ्याचे पूजन करून नारळ अर्पण करून पुढील कार्यक्रम सुरू होतो याचदरम्यान शिवव्याखान लहान लहान मुला मुलींची व मान्यवरांची भाषण सत्कार समारंभ शिवस्तुती म्हणत घोषणाबाजी देखील केली जाते तर शेवटी उपस्थित शिवभक्त आणि मान्यवर याचे आभार मानून आलेल्या सर्वांना उत्सव समिती कडून भोजनाची देखील व्यवस्था केली जाते..हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजयंती उत्सव समिती चे अध्यक्ष श्री.शिवाजी भोसले आणि सर्व कमिटी मेंबर सल्लागार कमिटी आणि शिवभक्त सदस्य खूप मेहनत घेतात तर या सोहळ्याला ग्रामस्थ मंडळ मुंबई मंडळ यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभते, सोबत जे बी शिव प्रतिष्ठान सातारा जिल्हा संस्थापक अध्यक्ष श्री.विजय भोसले आणि प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यांचा देखील विशेष सहभाग या नियोजनात असतो अशी माहिती शिवजयंती उत्सव समिती चे सल्लागार आणि शिवसेना जावळी तालुका संपर्क प्रमुख सामाजिक कार्यकर्ते श्री.राम शिंदे यांनी दिली..
Discussion about this post