शिरूर तालुका प्रतिनिधी:-
गांजासारख्या अंमली पदार्थाची विक्री थांबविण्यासाठी शिरूर पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ किलो ८४० ग्रॅम गांजासह एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई दिनांक ११ मार्च २०२५ रोजी करण्यात आली.
शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार अंबादास थोरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, समिर हजरतअली शेख (वय ३०, रा. जांबुत, ता. शिरूर) हा आपल्या घराजवळ गांजाची विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर यांच्याकडून परवानगी घेऊन पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला.
कारवाई दरम्यान आरोपीकडून ३८,८४०/- रुपये किमतीचा ३ किलो ८४० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शशिरूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १६९/२०२५, कलम ८ (क), २०, २२ एन.डी.पी.एस. कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाईत सहभागी पथक:
सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री. पंकज देशमुख (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दीपक करांडे, पो.हवा. भागवत गरकळ, बाळू भवर, पो.अं. अंबादास थोरे, पो.अं. भाऊसाहेब ठोसरे यांनी संयुक्तरीत्या केली आहे.
अटक करण्यात आलेल्या समिर हजरत अली शेख यास न्यायालयात हजर करण्यात येणार असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक करांडे करत आहेत.
Discussion about this post