

रूढी,परंपरा अंधश्रद्धा या चुकीच्या गोष्टी तसेच मानवी प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या घटनांना विरोध करण्यासाठी शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही हे जाणूनच महात्मा फुले व सावित्री माईने स्त्री शिक्षणाची कास धरली. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. त्या अधिकार व हक्काच्या जमिनीतून स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवत देशहितासाठी पुढाकार घेत असल्यामुळे आज स्त्री ही उंच भरारी घेत असून सक्षम बनत आहे. जिद्द ,चिकाटी व आत्मविश्वासाने स्पर्धेमध्ये आपले नाव लौकिक करीत आहे असे प्रतिपादन ॲड .मा. ज्योतीताई कोमलकर यांनी केले. त्या महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधत होत्या.
स्थानिक अनिकेत कॉलेज ऑफ सोशल वर्क ,वर्धा येथील ‘ राष्ट्रीय सेवा योजना ‘ महिला तक्रार विभाग अँटी रॅगिंग सेल च्या वतीने दिनांक 8 मार्च 2025 ला जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अरविंद पाटील, प्रमुख मार्गदर्शक अँड. मा. ज्योतीताई कोमलकर , डॉ. सोनाली खांडेकर, तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.रवींद्र सहारे आदींच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ अरविंद पाटील म्हणाले की स्त्री ही त्यागाची मूर्ती आहे. त्याग, समर्पण, उदारता, शालिनता, नम्रता आधी गुण युक्त असणारी स्त्री विज्ञान, कला, शिक्षण, व्यवसाय, प्रशासन आदि क्षेत्रात आपली छाप उमटवत आहे. स्त्री अस्तित्वाची जाणीव होत असून त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा गौरव करा. असे विचार डॉ अरविंद पाटील यांनी व्यक्त केले. ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी संविधान मूल्यांच्या संरक्षणासाठी ‘ मास्वे ‘ संघटनेद्वारे तयार करण्यात आलेले ” शिव्या मुक्त समाज अभियान ” बोधचिन्हाची विमोचन करण्यात आले.
संचालन कु. कल्याणी गाढवे, प्रास्ताविक डॉ. सोनाली खांडेकर तर आभार खूप कु.प्रेरणा राऊत यांनी मानले. डॉ. लोकेश नंदेश्वर,डॉ.योगेश मुनेश्वर, डॉ.रुपेश कुचेवार, डॉ. कैलाश बिसांद्रे, डॉ.प्रशांत शंभरकर, डॉ.मिलिंद घंगारे, संजय वानखडे, गौतम मून, जनार्दन सहारे, विनोद खंडारे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी चेतन राऊत, राजेश वाघमारे, ऋषी धोटे, विकास मसराम, अनिकेत इरपाची , संपदा बोकडे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Discussion about this post