
ठाकर आडगांव :-
दैनिक सारथी महाराष्ट्राचा :-
पत्रकार समाधान सम्राट..
गेवराई तालुक्यातील ठाकर आडगांव येथे बीड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.सुभाष साळवे तसेच गेवराई तालुका कृषी अधिकारी अभय वडकुते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विज्ञान केंद्र खामगाव तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय गेवराई यांच्यामार्फत शेतकरी शास्त्रज्ञ शेतकरी संवाद याबाबत शेती शाळा
संपन्न झाली.या संवाद बैठकीचे मुख्य उद्दिष्ट तसेच ध्येय असे होते की शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत करणे ,शेतकऱ्यांना कृषि तज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी देणे,
शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर शाश्वत आणि पारंपरिक आणि परवडणारे उपाय देणे या विषयावर शेतकरी व कृषी विज्ञान केंद्र मधील शास्त्रज्ञ यांच्या वतीने चर्चापर संवाद या विषयावर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र खामगाव चे प्र.कार्यक्रम समन्वयक तथा कृषी अभियांत्रिकी शास्त्रज्ञ श्री टी.बी.सुरपाम साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बी.बी.गायकवाड सर पिक संरक्षण शास्त्रज्ञ, कृ.वि.केद्र खामगाव कृषी विस्तार समन्वयक श्री.बी.टी येवले सर, जातेगाव मंडळ कृषी अधिकारी कु.अश्विनी मस्के मॅडम, ठाकर आडगाव चे सरपंच श्री.जाधव साहेब, कृषि मित्र बाबू कोकाट,यांची प्रमुख उपस्थिती होती.कृषी विज्ञान केंद्र खामगाव चे शास्त्रज्ञ श्री.टी.बी सुरपाम यांनी शेतकऱ्यांना विहीर पुनर्भरण बाबत माहिती दिली तर डॉ.बी.बी.गायकवाड सर यांनी ऊस पिकांवरील कीड, रोग या विषयावर माहिती सांगितली पुढे कृषी विस्तार समन्वयक श्री.बी.टी येवले सर,यांनी ऊस उत्पादन वाढीचे पंचसूत्रे या विषयवार मार्गदर्शन केले.या मध्ये प्रामुख्याने बेणे निवड, लागवडीचे अंतर,एकात्मिक खत व्यवस्थापन, ऊस पिकामध्ये संजीवकाचा वापर, आणि रोग व्यवस्थापन. इ.घटकावर सखोल मार्गदर्शन केले.तसेच मंडळ कृषी अधिकारी कु.अश्विनी मस्के यांनी शेतकऱ्यांना गहू व ज्वारी काढणी बाबत माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिलासा रुपी दिली तसेच कृषी मित्र बाबू कोकाट यांनी शेतकऱ्यांचे अँग्रीस्टॅक फॉर्मर आयडी मध्ये नोंदणी करून दिली व व शेतकऱ्यांनी लवकर ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी लवकर बनवून घ्यावे या बाबतीत माहिती दिली.या शेतकरी व शास्त्रज्ञ संवाद बैठक चे प्रस्ताविक श्री.वाघमारे साहेब यांनी केले तर आभार कृषी मित्र बाबू कोकाट यांनी मानले.या वेळी कार्यक्रमाला कृषी पर्यवेक्षक श्री.पवार साहेब,कृषी सहाय्यक श्री.सुतार साहेब, वाघमारे साहेब,वैद्य साहेब,पोटे मॅडम,आत्मा एटीएम श्री. घोडके साहेब,तसेच ठाकर आडगाव से.स.सोसायटी चेअरमन संदीप कोकाट,मा.चेअरमन सुधाकर कोकाट, रामेश्र्वर कोकाट, कैलास महाराज आनंदे,अजय कोकाट, विलास कोकाट, दैनिक सारथी महाराष्ट्राचा पत्रकार समाधान सम्राट, दादा कोकाट, गणेश काळे,रूद्र घोलप,कृष्णा कोकाट,वैभव जाधव,मंगेश काळे, महेश कोकाट,कांताराम जाधव, बापुराव कोकाट व यासह परिसरातील १६० ते १९० शेतकरी बांधवांची प्रमुख उपस्थिती होती या मुख्य कार्यक्रमातुन शेतकरी बांधवांना मुबलक माहिती शास्त्रज्ञांनी दिली त्याबद्दल सर्व शेतकरी बांधव समाधानकारक झाले..
Discussion about this post