रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचे १५ वर्षानंतर चे आयुर्मान संपुष्टात आल्यावर आर टी ओ कार्यालयाकडून पर्यावरण कर (ग्रीन टॅक्स) घेतला जातो आणि तोही भरणे बंधनकारक आहे. सध्या दिवसेंदिवस रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्याही वाढत आहे. त्याचप्रमाणात जुन्या वाहनांची संख्याही तितक्याच प्रमाणावर आहे. मात्र जुन्या वाहनांच्या नूतनीकरासाठी होणारी प्रक्रिया त्यासाठी लागणार खर्च आणि आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम मोठी असल्याने सध्या न परवडणारी आहे. ग्रीन टॅक्स च्या माध्यमातून सरकारी तिजोरीत यंदा निव्वळ २३ लाखांचा महसूल जमा झालाय. मात्र ग्रीन टॅक्स पोटी भरणा झालेली रक्कम कोटींच्या घरात आहे. मात्र सरकार फक्त सध्या आपली तिजोरी कशा प्रकारे भरेल याकडे लक्ष ठेऊन आहे विकासाच्या नावाखाली महसूल वाढीसाठी हा सर्व खटाटोप सुरु आहे. मात्र वाढत्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण सध्या चिंतेची बाब आहे. आज मितीस रस्त्यावर चालणाऱ्या हजारो वाहनांमुळे प्रदूषण पातळी झपाट्याने वाढत आहे. मात्र यावर आर टी ओ कार्यालयाकडे मात्रा काही नाही. फक्त ग्रीन टॅक्स च्या माध्यमातून राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये कशा प्रकारे भर घालता येईल याची काळजी हा विभाग घेत आहे. १५ वर्षापेक्षा जास्त आयुर्मान असणारी वाहने प्रदूषण पसरवण्यास कारणीभूत असल्याचे निदान मात्र या कार्यलयाने काढले आहे. पण वाहनधारकांच्या मानगुटीवर मात्र या ग्रीन टॅक्स चे ओझे लादण्यात आल्याच्या भावना वाहनधारकांमधून व्यक्त होत आहे.
Discussion about this post