अहिल्यानगर | जिल्हा प्रतिनिधी प्रशांत सोनवणे
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील सातवड गावात भावानेच भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
युवक सोमनाथ रामराव पाठक (वय ३५) याचा मृतदेह पहाटे घराच्या पाठीमागे आढळून आला. पाथर्डी पोलिसांनी तपास केला असता हा घातपात असल्याचा संशय आला.
काही तासांतच पोलिसांनी आरोपी डॉ. अशोक रामराव पाठक (वय ३९) याला राहता, जिल्हा अहिल्यानगर येथून ताब्यात घेतले.
संघटनेचा मागोवा – पोलिस तपासात खळबळजनक कबुली
मयताची आई सिंधू पाठक यांच्या खबरीवरून पोलिसांनी संशयित भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
आरोपीने कबुली दिली की, सोमनाथ हा रोज मद्यपान करून आईला आणि स्वतःच्या मुलाला मारहाण करत असे. त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने मलाही ठार मारण्याची धमकी दिली.


या वादातून मी त्याला लाकडी दांडक्याने मारले. तो संत्रा बागेत पळाला, तेव्हा मी त्याला बांधून पुन्हा मारहाण केली. हालचाल थांबल्यावर मी तिथून निघून गेलो, असे आरोपीने कबूल केले.
आईला आढळला मृतदेह
पहाटे सिंधू पाठक शेतात गेल्या असता त्यांना सोमनाथचा मृतदेह आढळून आला. त्यांनी त्वरित पोलिसांना कळवले.
आरोपी डॉ. अशोक पाठक याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
— जिल्हा प्रतिनिधी प्रशांत सोनवणे | सारथी महाराष्ट्र, अहिल्यानगर
Discussion about this post