
प्रतिनिधी-सोमनाथ यादव खोमणे
पेडगावच्या धर्मवीर गडाच्या संवर्धनासाठी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची 200 कोटींच्या निधीसाठी मागणी
अहिल्यानगर
: श्रीगोंदा तालुक्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या पेडगावच्या धर्मवीर गडाच्या संवर्धनासाठी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधिमंडळात 200 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.धर्मवीर गड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित असून,
त्याचे योग्य पद्धतीने संवर्धन व सुशोभीकरण होणे गरजेचे आहे. सध्या गडाची अवस्था दयनीय झाली असून, त्याच्या जीर्णोद्धारासाठी मोठ्या प्रमाणात निधी आवश्यक आहे. त्यामुळे गडाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्याच्या विकासासाठी हा निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी आमदार पाचपुते यांनी केली.
यासंदर्भात आमदार विक्रमसिंह पाचपुते म्हणाले, “धर्मवीर गड हा महाराष्ट्राच्या शौर्याचा प्रतीक आहे. गडाच्या संवर्धनासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. त्यासाठी 200 कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाकडे केली आहे.”गडाच्या विकासासाठी पर्यटन सुविधा, तटबंदी मजबुतीकरण, सभामंडप, शिवस्मारक, संग्रहालय, पायाभूत सुविधा आणि इतर ऐतिहासिक स्थळांचे पुनरुज्जीवन यासारखी कामे करण्यात येणार आहेत.
या मागणीला स्थानिक नागरिक आणि इतिहासप्रेमींचा मोठा पाठिंबा मिळत आहे.मुख्यमंत्र्यांकडून या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता शासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Discussion about this post