सरकारी रेशन दुकानातील गर्दी पहा. काही गरीब लोक हातात २०,००० चा मोबाइल घेऊन २ रुपये किलोचा तांदूळ घेण्यासाठी ७०,००० रुपयाच्या दुचाकीवर बसून येतात.
हातात २०,००० रुपयाचा मोबाइल, चेहऱ्यावर २००० /३००० रुपयाचा चष्मा असलेल्या महिला दिल्लीत फुक्कट बस प्रवास करण्यास मागतात.
बँकेत जन धन खात्यातून पाचशे रुपये काढण्यासाठी पतीसोबत सत्तर हजारांच्या मोटारसायकलवरून येतात आणि पुढचे पैसे कधी येतील अशी विचारणा करतात. हे आपल्या देशाचे सौंदर्य आहे.
तरीही म्हणतात की सरकार काही करत नाही.
नसबंदी करणार्यास केवळ १५०० रूपये आणि अपत्य झाल्यास ६००० रुपये देत असलेल्या देशात लोकसंख्या कशी नियंत्रित केली जाईल..?
जेव्हा एका राजाने गाढवांना सरळ रांगेत जाताना पाहिले तेव्हा त्याने गाढवाच्या मालकाला विचारले की, “ते सरळ कसे चालतात ?”
त्याने उत्तर दिले, “जो कुणी लाइन तोडेल त्याला मी शिक्षा करतो की, मग ते सरळ जातात.”
राजाने त्याला विचारले, माझ्या मंत्री मंडळात काम करशील…?” तो लगेच तयार झाला.
राजाने त्याला न्यायाधीश बनविले एकदा एका चोरट्याने चोरी केली तेव्हा त्याने त्या चोराचा हात कापण्याची शिक्षा सुनावली.
वकीलाने वजीराकडे पाहिले आणि न्यायाधीशाच्या कानात म्हणाला, “हा वजीराचा खास माणूस आहे.”
न्यायाधीश पुन्हा म्हणाला, त्याचा हात कापा, वजीर म्हणाला, “तो आपला स्वत:चा माणुस आहे, त्याला सांभाळून घ्या.”
यावेळी न्यायाधीश म्हणाला, “चोरांचा हात आणि वजीराची जीभ दोन्ही कापून टाका आणि त्या एका निर्णयाने आता देशात शांती कायम आहे.”.
आपल्या देशालाही हीच गरज आहे.
सरपंचाचा पगार ५००० रुपये असुनही २ वर्षानंतर त्यांच्याकडे स्कॉर्पिओ, फॉर्च्युनर कोठून येते. हे समजत नाही…?
एखादा मंत्री एका टर्म मध्ये 200 एकर जमीन, एखादा साखर कारखाना, अनेक कारखाने, अनेक कंपन्यांचे शेअर, किलोने सोने, मोक्याच्या ठिकाणी प्लॉट अशी प्रॉपर्टी कशी काय कमावतो कळतच नाही
ही कथा सर्वच लोकप्रतिनिधींशी संबंधित आहे.
भ्रष्टाचारमुक्त भारत मोहिमेचा एक भाग व्हा आणि हा संदेश पुढे पाठवा..
……….✍
Discussion about this post