

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम..
पालघर येथील दैनिक डहाणू मित्र आणि डहाणू मित्र न्यूज नेटवर्कचे लोकप्रिय संपादक रफीक गफार घाचि यांची आदर्श संपादक पुरस्कार २०२५ करिता नुकतीच निवड झाली आहे.मुंब ई मधील जाॅय ऑफ गिविंग मुंबई या सामाजिक संस्थेचा वर्धापनदिन जून २०२५ मध्ये मुंबईत प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार असून या वर्धापनदिना निमित्त समाजातील गोरगरीब वंचित घटकांसाठी आणि पत्रकारिता मधील प्रशंसनीय उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन संपादक रफीक गफार घाचि यांना आदर्श संपादक पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात येणार असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे यांनी निवड पत्रा व्दारे संपादक रफीक गफार घाचि यांना कळविले आहे.संपादक रफीक गफार घाचि यांची आदर्श संपादक पुरस्कार २०२५ साठी निवड झाल्याने विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून त्यांच्या वर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे..
Discussion about this post