


कन्नड :
मुस्लिम समाजाचा विशेष महत्त्व असलेला रमजान महिना दोन मार्च रोजी सुरू झाला.या रमजान महिन्यात कडक उन्हाळा सुरू आहे तरीही कन्नड तालुक्यातील करंजखेडा येथील शेख मुजीब शेख अनिस यांची मुलगी सादिया हीने वयाच्या ७ व्या वर्षी पहाटे सहरी करून उपवास सुरू केला.दिवसभर कोणतीही तक्रार न करता तिने संयम व श्रद्धेने उपवास पाळला व जीवनातील पहिला रोजा पूर्ण करून कुटुंबीयांसह हा क्षण मोठ्या भक्ती भावाने व उत्साहात साजरा केला.यावेळी शेख मुजीब अनिस यांच्या वतीने रोजा ईफ्तारीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आजोबा शेख अनिस काका शेख मोईस अनिस, शेख मतीन अनिस,सय्यद कदीर,खान आबेद,पाठन अमीन, सय्यद असेफ, शेख सद्दाम भाई,यांनी सादियाचे कौतुक केले..
प्रतिनिधी /कन्नड माजेद खान..
Discussion about this post