प्रतिनिधी:- सुरेश गायकवाड
येथे आयोजित करण्यात आला. बाल मित्र ग्राम प्रकल्पामध्ये महिलांची भूमिका खूप महत्वाची आहे. महिलांना कायदेविषयक माहिती देण्यासाठी ॲड अमृता खेडकर यांनी महिलांना कायदेविषयक अतिशय छान प्रकारे मार्गदर्शन केले आणि जिथे महिलाना मार्गदशनाची गरज असेल असेल तिथे आम्ही वकील संघटना नेहमीच मदतीला राहू असे त्यांनी आपल्या मार्गदशानात सांगितले. तसेच पोलिस विभागात नव्याने रुजू झालेल्या निकिता फलके यानी प्रत्येक आईने आपल्या मुलींची मैत्रीण झालं पाहिजे. तसेच कुणीही महिला संकटात असेल त्यांनी 24 तास सेवेत तत्पर असलेल्या पोलिस स्टेशन मध्ये संपर्क करावा अशी माहिती सांगितली.तसेच या कायदेशीर जनजागृती कार्यक्रमामध्ये समाजामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या, मलठण, निमगाव भोगी, कवठे येमाई या गावामधील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महिलांसाठी रांगोळी,गायन, नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी सामाजिक संदेश देऊन रांगोळ्या रेखाटल्या. महिलांना बक्षीस स्वरूपात मानचिन्ह देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मलठण गावच्या सरपंच सौ. माधुरीताई थोरात,CRP शबाना पटेल मॅडम , राणीताई कर्डिले यांनी सहकार्य केले तसेच संस्थेचे कार्यकर्ते लीलाधर रोठे , राधाबाई घेगडे, उज्ज्वला ताई इचके, सुप्रिया लंके, असिस्टंट प्रॉजेक्ट ऑफिसर रूपाली बोर्डे, तसेच प्रॉजेक्ट ऑफिसर अमोल राठोड यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रॉजेक्ट ऑफिसर अमोल राठोड सरांनी केले.
Discussion about this post