जामखेड तालुका प्रतिनिधी. सुनिल गोलांडे जामखेड दि – 26 ऑगस्ट जामखेड तालुक्यातील घोडेगाव येथील सैनिक संतोष कल्याण भोंडवे वय ( 40 ) यांचे पहाटे पाच वाजता जामखेड येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा एक मुलगी व वयोवृद्ध आई वडील असा परिवार आहे संतोष भोंडवे हे 2009 साली सैन्य दलात बॉर्डर ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये भरती झाले होते.
ते एक मनमिळावू स्वभावाचे मेजर होते सध्या ते अरुणाचल प्रदेश येथे चालक म्हणून कार्यरत होते गावी येण्यासाठी रजा टाकुन अरुणाचल प्रदेश येथुन दि – 11 2023 डिसेबर रोजी गावाकडे येत असताना इगतपुरी रेल्वे स्टेशन वर धावत्या रेल्वेतून त्यांच्या उतरताना त्यांचा अपघात झाला त्यांना पुणे येथे उपचार साठी तीन महीने ठेवले त्यानंतर गावी पाठवले अचानक काल त्यांची तबेत खालावल्याने त्यांना जामखेड येथील खाजगी रुगालयात दाखल केले परंतु रविवारी पहाटे पाच वाजता त्यांची प्राणज्योत गमावली नंतर ग्रामीण रुग्णालय जामखेड शवविच्छेदन केल्यानंतर घोडेगाव येथे शासकीय इतमानात अंत्यसंस्कार झाले परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post