शाळेत रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास वरोरा -याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी मान. नियोमी साटम मॅडम (IPS) यांची विशेष उपस्थिती होती. लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मान. श्रीकांतजी पाटील सर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मान. आशिषजी घुमे, आटो चालक संघटनेचे अध्यक्ष मान. विनोदजी खापणे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिता उरकांदे या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करणारे सर्व वाहनचालक बंधू यांना शाळेतल्या विद्यार्थ्यांनी राखी बांधली. हे सर्व वाहन चालक या विद्यार्थ्यांचे थोड्या वेळाकरिता का होईना पालक असतात त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतात म्हणून पालक व शाळा निर्धास्त असते. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन शाळेद्वारे दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो.
या निमित्ताने मान. साटम मॅडम यांनी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले. केवळ मोठेच लहान्यांचे रक्षण करू शकतात असे नाही तर लहान ही रक्षण करू शकतात. नव्हे आपणच स्वतःच स्वतःचे रक्षण करण्यासाठी सज्ज झाले पाहीजे असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. उरकांदे मॅडम व आभार प्रदर्शन कु. गोंडे मॅडम यांनी केले. आटो चालक संघटनेकडून सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
Discussion about this post