– जितेंद्र पोपट पवार
महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील शेवगे,तालुका-साक्री जिल्हा-धुळे या आदिवासी भागातील प्रयोगशील युवा शेतकरी मा. जितू (भाऊ) पवार यांची पंधरा एकर हंगामी बागायती शेती कांदा,कलिंगड, पिकॅडोर मिरची, अघोरी वांगी, मका, इत्यादी भाजीपाला पिकांचे उत्पादन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा हातखंडा असलेल्या जितू भाऊची सर्व जमीन डोंगराच्या पायथ्याशी, जास्त पाऊस झाला तर चिबड लागून राहते, कमी पाऊस झाला तर भाजीपाला पिकांचे उत्पादन घेता येत नाही,.
पावसाळ्यात जेव्हा मुख्य पिक पिक्याडोर मिरची चे उत्पादन घ्यायचे असेल तेव्हा उपलब्ध जमिनीवर पाणी असते म्हणून शेजारी असलेल्या डोंगर माथ्यावर किमान एक किलोमीटर अंतरावर उंच असलेली पाच एकर जमीन घेण्याचे ठरवले, सदर जमिनीसाठी उंच जाण्यास रस्ता तयार करुन नवीन जमीन घेतली त्या जमिनीवर सर्व दगड गोटे डोंगराचा चड उतार असल्याने लागवड योग्य जमीन करण्यासाठी एक वर्ष लागले डोंगर पायथ्यावरुन डोंगर माथ्यावर पाईपलाईन करून पाण्याची सोय उपलब्ध करून, ड्रिप द्वारे सर्व प्लॉट लागवड योग्य केले पहिल्या वर्षी पिकॅडोर मिरची लागवड केली .
योग्य नियोजन खत पाणी व्यवस्थापन, आणि जवळच असलेले सूरत मार्केट, पहिल्याच वर्षी तीस लाख रुपये पिकॅडोर मिरची चे उत्पादन घेऊन आदिवासी भागातील तरुण पिढीला एक नवा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला, पिकॅडोर मिरची नंतर त्याच प्लॉट मध्ये कांदा लागवड करून विक्रमी उत्पादन घेतले, अघोरी वांगी लागवड करून उत्पन्नाचे रेकॉर्ड मोडून काढले, सहकारी मित्र बापुसाहेब आकलाडे,यांचे मोलाची साथ, आई वडील, आणि दोन नोकरी करत असलेले भाऊ यांची मोलाची साथ मिळत असल्याने कोणत्याही संकटाशी दोन हात करून शेती क्षेत्रात लौकिक निर्माण करणारा शेतकरी म्हणून आदिवासी पट्ट्यात आदर्श निर्माण झाला आहे. नुकताच शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल नाशिक येथे कृषीथॉन च्या वतीने प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


Discussion about this post