कोकण किनारा गोविंदा पथक घासकोपरी शनिमंदिर विरार(पुर्व) यांचा २०२४ मध्ये 6 थराचा यशस्वी थरार
प्रतिनिधी -: नरेश मोरे (7039498699)
जगात एक नंबर, आपले कोकण लय सुंदर…! श्रीकृष्ण जयंतीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला/दहीहंडी हा सण साजरा केला जातो. या दिवशी उंच जागी दही पोहे भरलेली आणि फुलांच्या माळांनी सजवलेली हंडी टांगली जाते आणि गोविंदाची पथके एकावर एक थर रचून ही हंडी फोडतात. गाणी ,नाच ,उंच चढणा-या गोविंदाच्या अंगावर पाणी फेकुन त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न असा एकच दंगा यावेळी चाललेला असतो. असी ही आगळीवेगळी मजा असते. नुकतीच मंगळवार दि.२७ ऑगस्ट २०२४ रोजी आम्ही कोकणकर गुहागर मधील मुलांनी एकत्र येऊन सुरू केलेलं
कोकण किनारा गोविंदा पथक घासकोपरी शनि मंदिर (विरार) नगरीत वर्ष ३ रे साजरे करत, क्रिकेट च्या माध्यमातून निर्माण झालेली ओळख . मैत्री, ऋणानुबंध कायम ठेवत मायभुमी हौशी भजन मंडळ- वारकरी संप्रदाय आणि कोकण किनारा गोविंदा पथक यांची संकल्पना अवलंबली कोकणातली आपली परंपरा जपली पाहिजे. विरार मुंबईसारख्या मोठ्या शहरात राहायला अनेक गावांतील सर्व मुलांना एकत्र करण्याचा एकच हेतू म्हणजे आमच्या पाठीमागे मंडळ नाही कोणताही राजकीय पक्ष नाही. स्वतः मुलं खंबीर पणे एकमेकांच्या मागे उभी राहवून एकमेकांना अडीअडचणीच्या वेळेस धावून यावीत म्हणून आम्ही एकत्र येण्याचा पर्याय निवडला व यशस्वी होत आहे.
हि संकल्पना साकारण्यासाठी सुशांत जोशी, महेश येद्रे , प्रशांत जोशी, संदेश पाडदळे, रोहित घाणेकर, अभिषेक वाघे, प्रभु धावडे, हेमंत खांडेकर, Dj सचिन कुळये, कल्पेश खेराडे, सुरज कांबळे, सचिन मळेकर(कोच) इत्यादी सामिल झाले. सोबत अनेक गावांतील मुलांनी एकत्र येऊन सुरुवात केली. कोकण किनारा गोविंदा पथक नाव देण्यात आले. यावर्षी या गोविंदा पथकाने १ महिने रोज सराव करून ५ थरांची सलामी १४ ठिकाणी दिली. तर ३ ठिकाणी ६ थरांचा थरार यशस्वी झाला आणि गोल फिरता मोनोरा मानवंदना दिली. तिसरा थरावर व्यायाम बैठक ५ वेळा मारण्यात आला अशी आगळी वेगळी “संकल्पना” करत होते. तर वरचा छोटा गोविंदा रूद्र मळेकर, अर्णव (पिंपर गाव) गुहागरचा यांनी आयोजकांची मने जिंकली. भर पावसाची जोरदार संततधार सुरू असताना हि थरावर थर रचत होते.
या गोविंदा सोहळ्याला अनेक कोकणातली मुलं सहभागी होऊन विरार नालासोपारा, वसई अशा ठिकाणी सलामी देऊन एक हंडी फोडण्याचा मान मिळाला. या वर्षी एकुण ९ सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
सोबत सोशल मीडिया प्रसार Dj श्री सचिन कुळये यांच्या माध्यमातून फोटो, विडीओ कॅमेरामधुन नेत्रदीपक क्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, तरी उपस्थित गोविंदा,बाल गोपाळ, महिला वर्ग यांचे कोकण किनारा गोविंदा पथक आभार मानत आहे. एकंदरीत हा गोविंदा सोहळा धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.
Discussion about this post