कृपया प्रकाशनार्थ
सम्राट प्रसेनजीत समाज विकास संस्था नागपूर तर्फे जिजाऊ सावित्री मुक्ता विचार मंच आणि स्टुडंट एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जगप्रसिध्द साहित्यिक साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती तुडुंब गर्दीच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमाने संपन्न झाली.
मागील तेरा वर्षापासून संस्थेच्या वतीने समाजातील होतकरू गरजू आणि प्रतिभावंत मुलांचा शोध घेऊन त्यांना प्रस्थापित करण्याकरिता संस्था सतत प्रयत्नशील आहे. त्यातून विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम, आणि रोजगार आणि उद्योजकता शिबिरा ंच्याद्वारे हे कार्य करण्याचे काम सतत चालू आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन मंगेश वानखेडे उपायुक्त समाज कल्याण विभाग यांनी केले तर अध्यक्षस्थानी गोपालजी वानखेडे हे होते. याप्रसंगी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना संबोधताना बार्टीचे प्रोजेक्ट मॅनेजर श्रमन वासनिक यांनी स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात मार्गदर्शन केले तर मोटिवेशनल ट्रेनर्स देवेंद्रजी काटे यांनी दहावी बारावीनंतर शिक्षणाच्या संधीच्या संदर्भात मार्गदर्शन केले. समाजातील बेरोजगारी पाहता युवकांसाठी उद्योग आणि रोजगाराच्या संधी संदर्भात उत्कर्ष फाउंडेशनच्या संचालिका मीना भागवतकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना लातूरचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर आर एस देवणीकर यांनी सामाजिक प्रबोधन करताना आजची परिस्थिती आणि सुशिक्षित समाजाची जबाबदारी या विषयावर परखड मत व्यक्त केले.
समाजामध्ये परिवर्तन घडवायचे असेल तर आपल्या महापुरुषांची ओळख आणि आपला इतिहास माहीत असणे किती आवश्यक आहे हे समजावून सांगितले. आपल्या समाजाचा उद्धार करायचा असेल तर सुशिक्षित समाज आणि वरिष्ठ पदावर गेलेल्या समाजातील अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढते. आपण सुस्थितीत आल्यावर समाजातील दुर्बल घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्याबद्दल साठी प्रयत्न करण्यासाठी एक कृतिशील आराखडा तयार करण्याचे आव्हान डॉक्टर देवणीकर यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक जेठूजी वाघमारे, वामनराव अडागळे ,कमलाकर वानखेडे ,अंबादास कुचेकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच नरेश जी खंडारे आणि प्रकाशजी तायवाडे यांचा सेवानिवृत्ती प्रसंगी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कुंदाताई राऊत- उपाध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर, यशवंतराव सोळसे पोलीस निरीक्षक, प्रवीण जी वानखेडे नायब तहसीलदार, गजानन सनेसर सहकार अधिकारी, सुनीता बावणे अधिक्षिका आदिवासी आश्रम शाळा, मोना गायकवाड आरोग्य अधिकारी यांची उपस्थिती त्यांच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देत होती.
दोन सत्रात आयोजित कार्यक्रमातील सामाजिक प्रबोधन आणि शैक्षणिक क्षेत्रातील धुरंदरांनी केलेल्या फटकेबाजीने समस्त श्रोतोगण आणि विद्यार्थी मंत्रमुग्ध झालेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित वाघमारे यांनी प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रभाकर शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन स्टुडन्ट एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष उल्हास वानखेडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या सफल आयोजनासाठी सर्वश्री प्रकाश तेलंगे, संजय तायवाडे, नरेश खंडारे ,सोहम ठाकरे ,सुभाष साळवे, प्रकाश तायवडे ,राजू खडसे, किरण कुमार मनोरे संतोष रूपनारायण राजेश वानखेडे ,दीपिका अडागळे, सुरेखा तायवाडे ,संध्या अडागळे ,वैशाली ठाकरे, वर्षा वानखेडे ,प्रतिभा खंडारे ,उल्हास वानखेडे ,प्रभानंद बावणे ,मिलिंद घाटे, राजेश गायकवाड, सुभाष खंडाळ ,मनीष डोंगरे ,अमोल खडसे ,सागर हिवराळे ,देवेंद्र खडसे, आशिष सनेश्वर शंकर कावळे, प्रशांत वानखेडे,प्रवीण सनेश्वर, नितेश वानखेडे, मनीषकुमार अडागळे, नंदिनी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला जनतेचा आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Discussion about this post