
लोहा कंधार प्रतिनिधी..
लोहा कंधार मतदार संघातील विविध भागातील विकास कामासाठी लोहा कंधार चे लोकप्रिय आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिल्ली येथे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी साहेबांची भेट घेऊन मतदारसंघातील दळण वळण सोयी सुविधा करिता रस्ते अशा विविध मूलभूत विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली . यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव सावळे आदि मान्यवर उपस्थित होते. …… लोहा कंधार मतदार संघातील विविध विकासकामे करण्यासाठी आमदार साहेब यांचे प्रयत्न जोरात सुरूच आहेत ,तसेच लोहा कंधारचा रस्ता याकडे साहेबांची विशेष लक्ष आहे या रस्त्यामुळे लोहा कंधार मधील दळण वळणाची सोय होऊन ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील लोकांचा विकास कसा करतात याकडे या मागचे विशेष कारण आहे .गाव खेड्यातील अशा विविध रस्त्याच्या कामासाठी भरघोस निधी मिळावा याकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली..
Discussion about this post