रत्नागिरी जिल्ह्यातील नामांकित दहीहंडी पथकापैकी जय महाराष्ट्र गोविंदा पथक आणि जय हनुमान गोविंदा पथक आगरनरळ या दोन गोविंदा पथकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपली परंपरा कुठेतरी जोपासली जावी या हेतुने मुंबई मध्ये कामानिमित्त आलेल्या आगरनरळ गावातील तरुणांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कळवा, मुंबई सारख्या ठिकाणी राधा कृष्ण गोविंदा पथक आगरनरळ यांनी कळव्यातील बाळ-गोपाळांना एकत्र घेत यशस्वी रित्या न कोणाला इजा होता सुरक्षित ६ थरांचा मनोरा रचून ठिकठिकाणी सलामी देण्यात आली.
याचे भाग्य *राधा कृष्ण गोविंदा पथकाचे संस्थापक धर्मेंद्र दिवेकर, अध्यक्ष गितेश दिवेकर व उपाध्यक्ष प्रथमेश गंधेरे यांचे सहकारी अतुल शिंदे, प्रथमेश मिशाल, वामन महाकाळ, रोशन दिवेकर, तेजस महाकाळ, योगेश लवंदे, राकेश पडवळ, गौरव पालांडे, मनोज मेस्त्री, सिद्धार्थ दिवेकर, शिद्देश लवंदे, नागेश लवंडे, साई मिशाल, महेंद्र महाकाळ, यश लवंदे, जीवन महाकाळ, आदित्य कर्जवकर व सोबत इतर सहकारी या सर्वांच अनमोल योगदान लाभले.
या धावपळीच्या जगात कामानिमित्त आलेल्या तरुणांनी सतत तीन वर्ष यशस्वीरित्या आपले मानवी मनोरे रचून आपला सण साजरा केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना डोंबिवली शहराचे सहचिटणीस कु.सिद्धेश महाकाळ यांच्यातर्फे कौतुकास्पद सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.
Discussion about this post