

लोहा प्रतिनिधि……
विष्णुपुरी नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय असलेले हे एकमेव मोठे रुग्णालय आहे ते नांदेड शहर तसेच जवळच्या आजूबाजूच्या जवळील गावातील लोकांना सेवा पुरवते. मात्र आज विष्णुपुरी शासकीय रुग्णालय येथे अपघात विभागाच्या गेट वरील कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाईकासोबत धक्काबुक्की केली. तुम्ही धक्काबुक्की का करता असा जाब विचारले असता . अरेरावीची भाषा करत तुम्हाला जे करता येईल, ते करा .असे म्हणत आहेत . कर्मचाऱ्यांच्या या वागण्यामुळे रुग्णांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. तसेच येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी याकडे गंभीर्याने पहावे आणि याकडे लक्ष द्यावे अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक करत आहेत. तसेच या रुग्णालयात डासांचे प्रमाण भरपूर प्रमाणात असून , बसण्यासाठी कोणतेही सुविधा उपलब्ध नाही, रुग्णांच्या नातेवाईकाला दवाखान्याच्या बाहेर उघड्या वरती दिवस रात्र काढावी लागत आहेत .यासाठी वरिष्ठांनी व लोकप्रतिनिधींनी काय करता येईल , ते करून उर्मट कर्मचाऱ्यावर तातडीची कारवाई करून रुग्णांना न्याय मिळवून द्यावा . अशी मागणी रुग्णाचे नातेवाईक करत आहेत..
Discussion about this post