आष्टी प्रतिनिधी
आष्टी येथे आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये सायंकाळच्या वेळी शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
याबाबत अधिक माहिती अशी की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर, कृषि महाविद्यालय यांच्या वतीने व शेतकऱ्यांचे नेते माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून चार दिवसांच्या डॉ.स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
रोज हजारों शेतकरी प्रदर्शनाचा लाभ घेत आहेत. शेतकऱ्यांच्या मनोरंजनासाठी सायंकाळी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमा अंतर्गत पारंपारीक लोकगीते, लोककला, नाटक, शास्त्रीय संगीत, शेतकरी गीते, लोकनृत्य यांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये उदो उदो अंबाबाईचा, चलरे सर्जा चलरे राजा, आराधी गीत, याची सासू हरवली, गोंधळ गीत मल्हारी मार्तंड , आई जगदंबे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यावर आधारीत नाटीका, गोंधळ , झाशीची राणी,गोंधळ गीत-आई भवानी तुझ्या कृपेने,मर्दानी खेळ नाशिक ढोल,आराधी गीत, जोगवा गीत- लल्लाटी भंडार, देशभक्ती गीत,
देवाक काळजी रे
मल्हारी मल्हारी, तेलंगणा आदिवासी गीत
आई गोंधळाला ये, आदिवासी गीत- आदिवासी राजा
शेतकरी गीत-जोडीने पेरणी होऊ या गड्यांनो, देश रंगीला रंगीला इत्यादी वेगवेगळे गिते सादर केले. या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पंडित नेहरु जुनिअर कॉलेज,श्रीराम विद्यालय , महेश विद्यालय रुईनालकोल , अन्न तंत्र महाविद्यालय , डी. फार्मसी महाविद्यालय , पंडित नेहरु विद्यालय , भगवान जुनिअर कॉलेज,जय भवानी विद्यालय , कानिफनाथ विद्यालय ,बी. फार्मसी महाविद्यालय , छत्रपती, शाहू, फुले आंबेडकर कृषी महाविद्यालय, डिप्लोमा इन इंजिनियरिंग येथील महाविद्यालयांच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभागी होऊन उपस्थितांचा उत्साह वाढविला. कार्यक्रमास महिला व ग्रामस्थ विशेष करून युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post