कोराळ,ता.उमरगा,जि.धाराशिव येथील समुद्राल येथे घेण्यात आलेल्या १४ वर्षाखालील झालेल्या तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेत जि.प.प्रा.शाळा कोराळ येथील १४ वर्षे वयोगटातील मुलांनी प्रथम क्रमांक पटकावला.तालुकापातळीवर जि.प.प्राथमिक शाळेचा संघ प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान मिळविला आहे.समुद्राळ येथे तालुका स्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या स्पर्धेत कोराळ जि.प.च्या मुलांनी खो- खो स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला,तर मुलींनी सुध्दा उत्क्रष्ट कामगिरी करत तिसरा क्रमांक मिळविला.व गेल्या वर्षाची असलेल्या यशाची परंपरा कायम राखली आहे.
शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष अमरजीत भगत,मुख्याध्यापक बत्तलवाड सर आणि विशेष योगदान क्रीडा शिक्षक कवठे सर, गुळवे मॅडम,सय्यद सर,सोमवंशी सर,भाले सर,पावशेरे मॅडम,चोपडे मॅडम,गायकवाड सर यांनी खेळाडूंचे चांगली कामगीरी केल्याबद्दल अभिनंदन केले.


Discussion about this post