
*संत सेना महाराजांचे विचार आणि शिकवण समाजाला दिशादर्शक ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील*पाळधीत श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी*पाळधी /धरणगाव / जळगाव प्रतिनिधी दिनांक 30 ऑगस्ट – संत सेना महाराजांनी आपल्या जीवनात भक्तीला सर्वोच्च स्थान दिले असून त्यांच्या अभंगातून त्यांनी भक्तिरसाची उपासना केली. सेना महाराजांचे विचार आणि शिकवण आजही आपल्याला दिशादर्शक असून त्यांच्या विचार व शिकवणीतून आपल्याला जीवनात शांती, समाधान आणि आनंद मिळण्याचा मार्ग सापडतो. असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाळधीत आयोजित आयोजित कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा.जीवा सेना प्रदेशाध्यक्ष देविदास फुलपगार हे होते.*सुरुवातीला संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी निमित्त श्री सत्यनारायण पूजन व संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाल सोनवणे यांनी केले . सूत्रसंचालन गणेश फुलपगार यांनी तर आभार संदीप फुलपगार यांनी मानले. यावेळी पाळधी बु. लोकनियुक्त सरपंच विजयबापू पाटील, पाळधी खुर्दचे सरपंच पती शरद कोळी, उद्योजक दिलीप पाटील, चांदसर चे माजी सरपंच सचिन पवार, अ.भा.जीवा सेना प्रदेशाध्यक्ष देविदास फुलपगार, सेवानिवृत्त पी.एस.आय. नारायण सोनवणे, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, रवींद्र बोरणारे, कुमार श्रीरामे आदी मान्यवरांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पाळधी येथिल सलून दुकानदार संघटना व अखिल भारतीय जिवा सेना पदाधिकारी तसेच समाज बांधवांनी परिश्रम घेतले.
Discussion about this post