देगलूर येथील शिव प्रेमी संभाजी ब्रिगेड व शिवसेना उद्धव ठाकरे गट तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार डिसेंबर 2023 रोजी लोकार्पण केलेला माळवन येथील राजकोट किल्या ठिकाणचा छत्रपति शिवाजी महाराज यांचा पूर्णांक्रुति पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ शिवप्रेमीनी देगलूर मधे निदर्शने देऊन निषेध व्यक्त केला.
निक्रुष्ट दर्ज्याच्या या कामाची व संबंधितांची चौकशी करून कठोर कार्यवाही करून गुन्हे दाखल करावे . अशी घटना पुन्हा होऊ नये महा पुरुषांचा अवमान होऊ नये त्या साठी ऑडिट करून पुतळ्याच्या संवर्धनाची जबाबदारी शासनांनी घ्यावी असे निवेदन मा. उपजिल्हाधिकारी , तहसीलदार , पोलीस निरीक्षक व प्रशासन यांना दिले
या वेळी संभाजी ब्रिगेड चे राहुल पाटील थडके, जेजेराव पाटील शिंदे करदडखेडवाडीकर , डॉ सुनील जाधव, देविदास थडके ,सचिन वरखिंडे, बाबाराव कदम, शिवाजी केरुरे, अमोल मेह्त्रे ,ठावरे तुकाराम, हणमंत पाटील, चक्रधर भुताळे ,श्री निवास बिरादार, नंदू पाटील कुशावाडी कर, शिवाजी बिरादार व ईतर पदाधिकारी . शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पांडुरंग पाटील थडके ,सुनील नागशेट्टीवार , भगवान जाधव ,संजय जोशी, संदीप शिंदे ,श्री निवास बोगुलवार, विनोद सोनकांबळे माधवराव पाटील दुडुकनाळे व ईतर शिव प्रेमी, कॉंग्रेस नेते बालाजी पाटील थडके देगाव कर व ईतर अनेक पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते .
Discussion about this post