विजेचा तार लागल्याने बैलाचा जागीच मृत्य……
हंगामाच्या काळातच व पोळा सन उत्सवात बैल गेल्याने शेतकर्यावर दु:खाचा डोंगर कोसळला…
हिमायतनगर / प्रतिनीधी
हिमायतनगर तालुक्यातील सिबदरा येथील शेतकरी श्री गुरुदास सायन्ना घोसलवाड हे आपल्या शेतात कापसाची वखरणी करत असतांना त्यांच्या शेतात असलेल्या महावितरण कंपनीच्या पोल ला लावलेल्या तनाव्यात अचानक विज उतरल्याने शेतात चालु असलेल्या ओताच्या एका बैलाला शाॅक लागल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला
आगोदरच कर्जाच्या महापुरात बुडालेल्या शेतकर्यावर हंगामाच्या कामात येवढ मोठ संकट आल्याने व तसेच शेतकर्यांचा सर्वात मोठा सन उत्सव असलेला बैल पोळा अवघ्या दोन दिवसावर असतांना शिबदर येथील शेतकरी घोसलवाड यांच्यावर आलेल संकट हे कधीही भरुन न निघणार असल्याने सर्व परिसरा सह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
Discussion about this post