आदर्श गाव पिंपळवाडीला भेट
जालना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री पवार सर व विस्तार अधिकारी सूर्यवंशी सर यांनी आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळवाडी या गावाला भेट दिली. या भेटीत त्यांनी गावात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची तपासणी केली व ग्रामपंचायतीने राबवलेल्या सुविधांचा आढावा घेतला.
नळ योजना
संपूर्ण गावात प्रत्येक घरासाठी दोन नळांची सोय करण्यात आली आहे. एक नळ फिल्टर पाण्यासाठी व दुसरा साधे पाण्यासाठी पुरवण्यात आला आहे. या योजनेमुळे ग्रामस्थांना शुद्ध पाण्याची उपलब्धता सुनिश्चित झाल्याचे पाहून अधिकारीगणांनी समाधान व्यक्त केले.
गावातील उपक्रमांची प्रशंसा
रामग्रामातील उपक्रमांची पाहणी करून गटविकास व विस्तार अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांचे कौतुक केले. गावातील स्वच्छता अभियान, पाणी व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन यांसारख्या उपक्रमांची विशेष तोंडभरून प्रशंसा केली.
उपस्थित मान्यवर
या भेटीच्या वेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास पालवे, उपसरपंच बाबासाहेब गायकवाड, गजानन पालवे, विठ्ठल नाना कराळे, प्रकाश पालवे, सुरेश पालवे, शिवानंद पालवे, दीपक मुंडे, अशोक पालवे, प्रकाश पालवे, ग्रामसेवक पवार मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
Discussion about this post