
अवघ्या वयाच्या 19 व्या वर्षापासून जनसेवेचे आणि दुष्काळी खानापूर घाटमाथा जलमय करण्याचे स्वप्न उराशी घेवून राजकीय कारकीर्द सुरू करणारा सामान्य कुटुंबातील कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणारा सामान्य कार्यकर्ता.
1969 साली गार्डी गावचे बिनविरोध सरपंच ते 4 वेळा 1990,1999,2014,2019 आमदार असा संघर्षमय प्रवास करणारे खानापूर-आटपाडी विसापूर सर्कल मतदार संघाचे लाडके दिवंगत पाणीदार दमदार कार्यसम्राट आमदार.स्व.अनिल भाऊ बाबर.
खानापुर – आटपाडी, घाटमाथा सुजलाम सुफलाम करण्यासाठी अगदी 1993- 1994 सालापासून टेंभू योजनेची मांडणी आणि शेवटपर्यंत पाठपुरावा करून मतदारसंघातील जी काही वंचित गावे होती त्यांना या योजनेचा शेवटचा टप्पा.क्र.6 पुर्ण करुन दिलेला शब्द पाळला.
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मतदार संघातील प्रत्येक सामान्य लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपडणारे नेतृत्व आणि माझ्या दुष्काळी मतदार संघातील शेवटच्या गावापर्यंत टेंभू योजनेच्या माध्यमातून पाणी कसे पोहचेल आणि माझा प्रत्येक शेतकरी कसा सुखावेल यासाठी सदैव तत्पर असणारा नेता.म्हणजे पाणीदार दमदार आमदार स्व.अनिल भाऊ बाबर.
24 तास लोकांसाठी अढी-अडचनीला उभे राहणारे,स्व.पाणीदार आमदार.अनिल भाऊ बाबर यांनी अलीकडच्या दहा-बारा वर्षात खानापूर आटपाडी मतदार संघाचा विकासाच्या माध्यमातून चेहरा – मोहराच बदलून टाकला. टेंभू योजनेच्या माध्यमातून गावोगावी पाणी पोहचवून शेतकरी राजा स्वावलंबी बनवण्याचे त्याचे दारिद्य्र मिठवण्याचे काम अनिल भाऊ यांनी केले.म्हणूनच मतदार संघातील जनतेने भाऊंना टेंभू योजनेचे जनक पाणीदार दमदार कार्यसम्राट आमदार म्हणून पदवी देवून त्यांच्या कामाची पोचपावतीच दिली.
अगदी काल- परवा पर्यंत खानापूर-आटपाडी- विसापूर सर्कल दुष्काळी भाग म्हणून ओळख असणारा मतदार संघाचा डाग कायमचा पुसण्यासाठी टेंभू योजनेच्या माध्यमातून पाणीदार दमदार कार्यसम्राट आमदार स्व.अनिल भाऊ बाबर 1993 -1994 पासून जे स्वप्न उराशी बाळगून धडपडले ते स्वप्न अखेर पूर्ण होत आहे.जरी आज स्व.अनिल भाऊ आपल्यात नसले तरी त्यांच्या पश्चात युवा नेते सुहास भैया बाबर यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून महायुती चे लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब ,उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजित दादा यांच्या माघे लागून भरघोस निधी उपलब्ध करून टेंभू योजनेचा शेवटचा टप्पा.क्र 6 पुर्ण करुन स्व.अनिल भाऊ बाबर यांचे स्वप्न पूर्णत्वास नेहले.आणि आगदी मतदार संघातील शेवटच्या प्रत्येक वंचित भागाला पाणी पोहचवले. या टप्प्याचे लवकरच उद्घाटन मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांचे हस्ते होईल. पण या दिव्य सोहळ्यास आपल्या मतदार संघाचे लाडके पाणीदार दमदार कार्यसम्राट आमदार स्व.अनिल भाऊ बाबर यांची उणीव नक्कीच भासेल.
सलाम भाऊंच्या जिद्दीला🫡.
अभिषेक मनोहर नलवडे
पंचलिंगनगर (भाळवणी)
ता.खानापूर, जिल्हा.सांगली.
Discussion about this post