मोखाड्यामधे शिक्षण हक्क कायदा कागदावरच
शिक्षण हक्क कायदा सांगतो मुलाला मोफत आणि शक्तीचे शिक्षण दिले पाहिजे या बरोबर या कायद्यात अनेक बाबींचा समावेश आहे मात्र आता मोखाडा तालुक्यात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे समोर आले असुन सगळा कारभार कागदोपत्री चालल्याचे दिसून येत आहे कारण मोखाडा तालुक्यांतील केंद्र शाळा आसे या जिल्हा परिषद शाळेचं गंभीर प्रकरण समोर आले आहे या ठिकाणी 1ते 8 चे वर्ग असुन येथे 56 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र यातील गंभीर बाब म्हणजे 15 जुन म्हणजेच शाळा सुरू झाल्यापासून चौथीचा 1 सहावीचे 2 आणि सातवी 2 असे फक्त पाचच विद्यार्थी शिक्षण घेत असुन हजर राहत आहेत
यामुळे फक्त शाळां शाळाबाह्य विद्यार्थी दिसू नये यासाठी कागदोपत्री पट दाखवला गेला असला तरी या उरलेल्या 51 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय आणि एवढा गंभीर विषय समोर असताना जिल्ह्यापासुन तालुक्यापर्यत अस्तित्वात असलेली शिक्षण व्यवस्था नेमकं काय काम करतेय असा सवाल आता उपस्थित होत आहे
रामदास कोरडे – ग्रामस्थ आसे
या जिल्हा परिषद शाळेकडे अजिबात कोणाचं लक्ष नाही हि बाब मी गटविकास अधिकारी गट शिक्षणाधिकारी केंद्र प्रमुख अशा सर्वांच्या निर्दशनास आणुन मात्र आजवर कोणीही भेट दिली नाही.यामुळे जर जबाबदार अधिका-यांनाच शिक्षणाचे काही पडलेले नसेल तर पालक तरी काय करतील शिक्षकांच्या ढासळलेल्या कारभारामुळे या शाळेची अशी अवस्था झाली आहे
प्रतिनिधी – रामदास बदादे
Discussion about this post