महसूल सप्ताह नव्हे महसुल पंधरवडा साजरा होणार,– तहसीलदार मोहनमाला नझीरकर
यावल प्रतिनिधी फिरोज तडवी
महसूल दीनाच्या कार्यक्रमात तहसीलदार मोहन माला नजिरकर व नायब तहसीलदार संतोष विनंते तर महीला बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांनी प्रथम रक्तदान करण्यास सुरुवात केली यांच्यासह बहुतांशी महसूल कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले
महसूल विभागाकडून दरवर्षी महसूल दीन व महसूल सप्ताहाचे आयोजन केले जाते या वर्षी महसूल मंत्री यांनी बदल करून महसूल पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत महसूल पंधरवडा साजरा केला जाणार आहे.
या 15 दिवसात महसूल विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबवून महसूल विभागाचा कारभाराची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवली जाईल आणि लोकांमध्ये महसूल विभागाबद्दल अधिक विश्वास निर्माण होऊन कारभार अधिक लोकाभिमुख होईल, असा विश्वास तहसीलदार मोहंनमाला नाजिरकर यांनी व्यक्त केला.
महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची नागरिकांना अधिक माहिती मिळावी आणि त्यांची कामे जलद आणि सोपी व्हावी यासाठी महसूल सप्ताह १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट राबविला जाणार
सुविधांची नागरिकांना अधिक माहिती मिळावी आणि त्यांची कामे जलद आणि सोपी व्हावी यासाठी महसूल सप्ताह १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट राबविला जाणार आहे. या पंधरवड्यात विविध उपक्रम राबविले जाणार असून नागरिकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. १ ऑगस्टरोजी महसूल दिन साजरा करून महसूल सप्ताहाचा प्रारंभ केला जाईल.
या दिवशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जदारांना लागणारी सर्व कागदपत्रे दिली जातील. ,ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, कृषी मार्गदर्शन कार्यक्रम, पाऊस आणि दाखले उपक्रम राबविला जाणार आहे.
संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी- कर्मचारी यांच्याशी संवाद आणि उत्कृष्ट कामे केलेल्या कर्मचारी पुरस्कार वितरण आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ साजरा केला जाईल. सदर उपक्रमामुळे शासनबद्दल नागरिकांत विश्वास वाढीस लागून कामकाज अधिक लोकाभिमुख होईल, कार्यक्रमास महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Discussion about this post