कु. स्नेहल राकेश कांबळे हिने
अत्यंत गरिबीतून व जिद्द चिकाटीतून फुले शाहू आंबेडकर यांना आदर्श मानून B.SL.LLB हि पदवी प्राप्त केली आहे. कु स्नेहल राकेश कांबळे हीची घरची पिस्थिती पाहता अत्यंत बेताची आहे तिचे वडील वीटभट्टी वरती मोलमजुरी करतात मोल मजुरीच्या जेमतेम पागारमधे काबाड कष्ट करुन आपल्या मुलीच्या शिक्षन पोटाला चिमटा काढून पूर्ण करुन दाखविले आणि कु स्नेहल हीचा मोठा भाऊ राहुल कांबळे यांनी सुद्धा आपल्या बहिणीच्या शिक्षणा साठी लागेल ती मदत केली
आपल्या वडिलांच्या आणि भावाच्या कष्टाची जान ठेऊन मुलीने सुद्धा आपल्या जिद्दीच्या व चिकाटीच्या जोरावर शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर मधून B.SL.LLB हि पदवी 73.84% गुण मिळून प्राप्त केली आहे व आपल्या वडीलांच्या व भावाच्या कष्टची चिज करून. दाखविले आहे.
ॲड कु
स्नेहल कांबळे B.SL.LLB ही पदवी प्राप्त करुण आपल्या कुरुंदवाड गावी येताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून वंदन केले . व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून बौद्ध समाज मंदिर पर्यंत समस्त बौद्ध समाजाच्या वतीने हलगीच्या जोरावर कुमारी स्नेहल कांबळे हिची मिरवणूक काढण्यात आली व अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. यावेळी बौद्ध समाजातील सर्व बांधव उपस्थित होते.
Discussion about this post