शेवकर बंधूच्या सर्जा राजाला वेशीतून प्रथम जाण्याचा मान….
निफाड तालुक्यातील कसबे सुकेने येथील बैलपोळ्याला ब्रिटिश कालीन ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. अशा या ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या बैलपोळा सणाला सायंकाळी सहा वाजता बैल मिरवणूक साठी शेवकर कुटुंबातील बंधूंना वेशीतून प्रथम जाण्याचा मान आहे. सायंकाळी सहा वाजता कुटुंबातील सुहासिनी पश्चिमेला असलेल्या सुरेख अशी रंगरंगोटी करण्यात आलेल्या….
प्रवेशद्वाराजवळ त्यांच्या बैलांच औक्षण करतात पुरणपोळी भाजी भाकरीचा नैवेद्य देतात. यावेळी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिक व सर्व शेवकर कुटुंब उपस्थित असते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात…..
विशेष मान, सन्मान असलेल्या सर्जा राजाला मुख्य वेशीतून प्रथम जाण्याचा मान मिळाल्यानंतर गावातील इतर शेतकऱ्याच्या बैलांना वेशीतून जाण्याची संधी मिळते. या अनोख्या बैलपोळ्याचा उत्साह पाहण्यासाठी दिवसभर पावसाची संततधार चालू असतानाही पंचक्रोशीतील नागरिकांनी, तरुणांनी,शेतकरी माता-भगिनींची मोठी गर्दी उसळली होती. यावेळी ओझर पोलीस स्टेशन अंतर्गत कसबे सुकेने येथील आउट पोस्टचे पोलीस…..
यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
Discussion about this post