वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेवगाव ग्रामीण रुग्णालय येथील होणारे घंटा बजाओ आंदोलन वैद्यकीय अधीक्षक यांच्या विनंतीने स्थगित
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्याबरोबत केली दीडतास चर्चा
शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालय प्रशासनाकडून तालुक्यातील रुग्णांना मिळणाऱ्या वागणुकी विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २२-८ -२०२४ रोजी लेखी निवेदन देण्यात आले होते या निवेदनात शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात होत असलेल्या अनेक समस्या बाबत तक्रारींची त्वरित दखल घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती मागण्या मान्य न झाल्यास व प्रशासनात सुधारणा ना झाल्यास रुग्णालयात घंटा बजाव आंदोलन करण्यात येईल असे नेवदन देण्यात आले होते
त्याची तात्काळ दखल घेऊन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ रामेश्वर काटे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांना आंदोलन न करण्याची विनंती केली आणि आज दिडतास सर्व मागण्याबाबत चर्चा केली, यावेळी शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, उपाध्यक्ष लक्ष्मण मोरे, गणेश भिसे, अस्लम पठाण,भीमा गायकवाड उपस्थित होते
यावेळी प्रा किसन चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया देतांना रुग्णालय प्रशासनाला इशारा दिला की शेवगाव शहर व तालुक्यातील गोरगरीब कुटुंबांना यानंतर काही त्रास झाला तर पुढील काळात तिव्र आंदोलन करण्यात येईल
Discussion about this post