धाराशिव जिल्हा प्रतिनिधी भगवान बांगर भुम — एस बि आय बँकेच्या किमान दोन शाखा भूम शहरात हव्यात अशी अनेक दिवसांपासून जनतेचि मागणी आहे स्टेट बँक ऑफ हैदराबाद आणि एसबीआय शाखा भूम यांचे विलगीकरण झाल्यानंतर पासून एसबीआय बँक परंडा रोड भूम येथे नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे अनेक वेळा एन सणासुदीच्या वेळी लांबच लांब रांगा लागल्याचे अनेकदा आपण पाहिले आहे या मुळे नागरिकांचे हाल आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्येष्ठ नागरिकांना महिलांना खूप मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे
यातच मुख्यमंत्री लाडली बहीण योजने च्या कागदपत्रांची झुळझुळ करून बँकेत एकेवायसी करण्यासाठी महिलांचे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे शहरी व ग्रामीण भागात तेल सर्व महिला एकेवायसीसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया च्या समोर गर्दी करताना पाहायला मिळत आहेत गाव खेड्यातील महिला यांना आपले स्वतःचे रोजंदारी बुडवून ही केवायसी साठी दोन-दोन दिवस फलकाते घालावी लागत आहेत पाचशे रुपये हजार रुपये कामाचे हजेरी बुडून कामगारांना या ठिकाणी आधार लिंकिंग साठी
एक ए वाय सी साठी नवीन पासबुक घेण्यासाठी खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे याची शासनाने दखल घेऊन शहरात दोन एसबीआय शाखा असायला हव्यात परंतु कुठल्याही प्रकारे बँक प्रशासन यावर लक्ष देत नाही तसेच बँकेच्या जागा छोटी असल्याने यातच आधार एक ऐवायसी चे काम सुरू असल्याने पीक कर्जाचे काम दैनंदिन व्यवहार याचा सुरू असल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत अनेक ज्येष्ठ नागरिक महिलांना वारंवार गर्दीत थांबून चक्कर येण्याचे प्रकार घडलेले आहेत एसबीआयच्या रिजनल मॅनेजर यांनी याचा गांभीर्याने विचार करून नागरिकांच्या सोयीसाठी दोन शाखांची उपाय योजना करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे
Discussion about this post