
पुणे जिल्हा प्रतिनिधी :- राजेंद्र शिंदे
येत्या दोन दिवसावर गणेश उस्तव येऊन ठेपला आहे. यामुळे भिगवण बाजारपेठेमध्ये गणपती व गौरी साठी लागणाऱ्या साहित्यांच्या स्टॉल ची गर्दी दिसु लागली आहे.
गौरी गणपती उस्तव म्हणजे सर्व घरात आनंदी व उस्तहाचे वातावरण असते लहानांपासून थोरांपर्यंत आकर्षण असलेला गणेश उस्तव काही दिवसावर येऊन ठेपला आहे, गृहिणी वर्गाची घरातील स्वच्छता व आवरावरीचे कामे सुरू झाली आहे. तसेच खरेदी साठी व गौरी साठी लागणाऱ्या फराळ बनवण्याची लगबग सुरू झाली आहे.

7 सप्टेंबर रोजी गणपती आगमन आहे व 10 तारखेला गौरी आगमन आहे गणपती साठी लागणारे मखर, हार, माळा व इतर साहित्य तसेच गौरी सजावटी साठी लागणारे तोरण गौरी मुखवटे मंडप विविध विद्युत लाईट माळा सजावटीचे साहित्य खरेदी साठी ग्राहकांनी गर्दी केली आहे त्याचबरोबर किराणा दुकानात देखील गर्दी दिसुन आली.
या वर्षी गणपती, गौरया डेकोरेशन व फळे या सर्वांची विक्री दरवर्षी प्रमाणे भिगवण धान्य मार्केट मध्ये केली जाईल. तरी सर्व गणेशभक्तांना व ग्राहकांना विनंती आहे की भिगवण धान्य मार्केट मध्ये येऊन खरेदी करावी. असे आव्हाहन भिगवण ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आले.

गौरी गणपतीच्या पार्श्वभूमीवर सर्व महिला भगिनींसाठी हृदया उद्योजिका ग्रुप यांच्यावतीने गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे उत्कृष्ट सजावट करणाऱ्या महिला भगिनींसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे. तरी भिगवण परिसरातील जास्तीत जास्त महिला भगिनींनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असे हृदया उद्योजिका ग्रुप च्या संस्थापक अध्यक्षा मेघाताई शेलार यांनी आव्हान केले आहे.

Discussion about this post