आजरा शहरालगत आंबोली रोड येथे नारायण बाग ही पूर्वी वापरात होती. कर्मचारी व पुरेसा कर्मचारी वर्ग व मनुष्यबळ कमी असलेमुळे तेथे सर्व बाग बंद केली. त्या बागेत १२.१९ हेक्टर क्षेत्र असून कृषी .चिकित्सालय व फळबाग रोपवाटिका 46.35 हेक्टर अशी 58.54 हेक्टर क्षेत्र आहे. शासनाच्या धोरणामुळे वनौषधी पार्क म्हणून उपयोग केला होता त्यामुळे सर्व जळून खाक झाले. पहिल्यांदाच हा एमआयडीसी विस्तार होणार असून १७ आक्टोबर २०११ ही जागा रोपवाटीका, तालुका बीजगुणन केंद्राच्या जमीनी नगरपालिका खाजगी संस्था शासकीय संस्थाना हसतातरीत न करणेचा निर्णय केला होता. परंतु हा प्रस्ताव कृषीमंत्र्यांजवळ गेल्यावर यावर प्रस्तावावर निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यामंत्री यांना असून निर्णय तेच घेवू शकतात त्यामुळे हा प्रसाव सादर केला त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली.
Discussion about this post