शेवगाव पंचायत समितीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बोंबाबोंब व ठिय्या आंदोलन…
शेवगाव (प्रतिनिधी- गणेश बोरुडे )- शेवगाव तालुक्यातील एरंडगाव समसूदच्या सरपंच महिला आहेत मात्र त्यांचे पतीच ग्रामपंचायतचा कारभार पाहतात सरपंच कधीही कार्यालयात येत नाही मासिक बैठका सुद्धा सरपंचच्या खुर्चीत बसून त्यांचे पतीच घेतात कुणी काही विचारना केली तर महिला सरपंच चे पती दमबाजी करतात याला सर्वस्वी ग्रामसेवकच जबाबदार असल्याने ग्रामसेवक यांच्यावर आणि महिना महिना गैरहजर असणाऱ्या आणि गैरहजर राहूनही कर्मचाऱ्याला आपल्या सह्या करायला लावणाऱ्या आरोग्य अधिकारी यांच्यावर चौकशी करून तात्काळ कारवाई करावी यासाठी आज वंचित बहुजन आघाडी व एरंडगाव समसूद येथील ग्रामस्थांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे महासचिव प्रा किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव पंचायत समिती मध्ये आज दोन तास बोंबा बोंब आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम यांच्या बरोबर चर्चा होऊन दहा दिवसात सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात वंचितचे शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गजभिव, अमरापूर ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर म्हस्के, भगुर ग्रामपंचायत सदस्य प्रसाद गरुड,रवींद्र निळ, सागर गरुड कल्याण भागवत सर, मनोहर गजभीव,गोरख तुपविहीरे, दादा बनसोडे, गणेश भिसे, पप्पू गर्जे, दादासाहेब गाढेकर, एकनाथ जगधने, विष्णू वीर, बाळासाहेब भोंगळे, संदिप घाडगे, दादा गजभीव, अमोल कसबे, अनिल गजभीव,शाहुल गजभीव, राजेंद्र मगर, मनोहर गजभीव,लुकास गजभीव, बाळासाहेब जगधने, अनिल गजभीव, विठ्ठल जगधने, आकाश गजभीव,सागर गजभिव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आंदोलन कर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने पंचायत समिती कार्यालय दनाणून गेले.
Discussion about this post