मौजे रावतळे कुरुडगाव येथे
प्रा किसन चव्हाण यांची घोंगडी बैठक संपन्न
शेवगाव (प्रतिनिधी गणेश बोरुडे)- आज गुरुवार दि 06 सप्टेंबर 2024 रोजी शेवगाव तालुक्यातील रावतळे कुरुडगाव येथे ग्रामस्थांचे प्रश्न समजुन घेऊन ते सोडविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांची घोंगडी बैठक संपन्न झाली, यामध्ये सात बारा उताऱ्या वरील पोट खराबा नोंदी, रेशनिंग, वीज, रस्ते यासह अनेक प्रश्ना वर चर्चा झाली यावेळी समंधित अधिकाऱ्यांना तात्काळ फोन करून चर्चा केली.
यावेळी वंचितचे तालुका अध्यक्ष प्यारेलालभाई शेख शेवगाव शहर उपाध्यक्ष लक्ष्मण मोरे महादेव शिंदे,ग्रा सदस्य रोहिदास निळ, रवींद्र निळ सुनील निळ,शरद अंगरखे, सुधाकर निळ, सोमनाथ गायकवाड,देवदान निळ, कवडे दत्तात्रय, वसंत निळ,अणिल निळ, महादेव अंगरखे, सिताराम निळ, सुभाष निळ प्रभाकर खंडागळे सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post