पट्टणकोडोली प्रतिनिधी:-आमचे बंधू मित्र श्री राहुल निवास कोळी यांचा कामावर असताना अचानक दुर्दैवी अपघाताची घटना घडली.
असे म्हणतात जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला याप्रमाणे गेल्या चार दिवसापासून राहुल यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. पण काळाने घात केला व आमचे बंधू मित्र कैलासवासी श्री राहुल निवास कोळी यांचे प्राणज्योत मावळली.
ही घटना कानावर येतात संपूर्ण गावांमध्ये हळहळ पसरली आहे त्यांच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, पत्नी व लहान मुले असा मोठा परिवार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
Discussion about this post