मलकापुर तालुक्यातील घरकुल योजना लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान पाच दिवसांत वितरीत करा अन्यथा दि.१० सप्टेंबर पासुन बेमुदत ऊपोषण करण्यात येईल असा इशारा शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांची घरकुले मंजूर करण्यात आली असून शासनाने लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम न दिल्याने घरकुलांचे काम रखडले आहे.तालुक्यात आलेल्या चक्रीवादळामुळे व अतिवृष्टीमुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली असून अनेकांचे संसार रस्त्यावर पडलेले आहेत.त्यामुळे शासनस्तरावर दखल घेऊन लाभार्थ्यांना रखडलेले अनुदान त्वरित देण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर शिवसेना उबाठा शहरप्रमुख गजानन ठोसर,राजेशसिंह राजपुत,शे.समद कुरेशी, इम्रान लकी,सै.वसिम, रविन्द्र गव्हाचे,पवन गरुड,चांद चव्हाण, ओंकार पाटील,जाकीर शहा,असिम खान, रिजवान शहा, वसिम जमादार, नरेंद्र, मुश्ताक पठाण यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

Discussion about this post