आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी आज रवंदे येथे विविध विकासकामांची पाहणी केली तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला व नागरिकांशी संवाद साधला.
रवंदे येथे आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या माध्यमातून रवंदे – ब्राह्मणगाव – येसगाव रस्ता, रवंदे ते जिल्हा हद्द रस्ता ह्या प्रमुख रस्त्यांसह अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून पाणीपुरवठा योजना, रवंदे – सोनारी रस्ता यासह काही कामे प्रगतीपथावर आहेत. आशुतोषदादांच्या माध्यमातून रवंदे गावाचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्यामुळे व रवंदे गावच्या विकासासाठी भरघोस निधी मिळवून दिल्याबद्दल नागरिकांनी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांचा सत्कार करुन त्यांचे आभार मानले.
यावेळी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांना भेट देऊन त्यांना अभिवादन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे पदाधिकारी, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Discussion about this post