अवसरी खु. ता. आंबेगाव जि. पुणे येथील मागास्वर्ग समाजाची ताबा वहीवट आसखेली शेत जमीन जमीन एजन्ट ने घोडेगाव महसूल चे अधिकारी मंचर सर्कल व गाव तलाठी यांना पैसे देऊन 7/12नोंदी मध्ये एजन्ट चे नाव एड करून जमीन लुबाडण्या चा प्रयत्न केला आहे. या बाबतची सखोल चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार घोडेगाव यांना दिले. चौकशी 9 महिने चालली, या चौकशी ला आरोपी तलाठी व सर्कल हजर झाले नाही. तहसीलदार यांनी त्यांना हजर राहणायाचे नोटीस काढले परंतु हे हजर राहिले नाही. शेवटी तहसीलदार यांनी केस बंद केली. व चौकशी आदेश काढला. परंतु तहसीलदार यांनी या दोषी सरकारी अधिकाऱ्यांना दोषी न ठरवता, त्यांचा जबाब नोंदवून अहवाल तयार केला. शेतकऱ्यां ने या बाबत तहसीलदार यांना विचारले असता, तहसीलदार यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. आरोपी हजर राहत नाही, तो त्याचे म्हणणे मांडीत नाही, मग तो गुन्हेगार ठरतो हे कायद्याच्या नियमात आहे. मग या प्रकरणात तहसीलदार यांनी असे का केली. शेतकरी भूमिहीन झाला आहे. तहसीलदार यांनी अहवाल बदलून गुन्हेगार यांना निलंब केले नाही तर खूप मोठे मागास्वर्ग शेतकरी आंदोलन करणार आहे. हि जमीन लुबाडण्यात शिवशेना (उभाठा )पक्षाचा पुणे जिल्हा शाखा प्रमुख आहे. यांचा आतून खूप मोठे सहकार्य हि जमीन लुबाण्यात मदत आहे. हि लुबाडलेली जमीन या एजन्ट कडून या शाखा प्रमुख ने आपल्या मुलांच्या नावे केली आहे. या सर्वांनी गुन्हा केला आहे यांच्या वर फौंजदारी गुन्हा दाखल करणार आहे. तरी हि न्याय मिळाला नाही तर शेतकरी जिल्हाधिकारी पुणे यांच्या पुढे आत्म दहन करणार असे म्हणाला
बातमीदार
काळुराम राजगुरू पुणे
Mo. 9604525101
Discussion about this post