आरमोरी : आ. कृष्णा गजबे यांनी राष्ट्रीय महामार्ग आरमोरी ते गडचिरोली पर्यंत जाणाऱ्या मुख्य डांबरीकरण मार्गाची स्वतः पाहणी करून अडखडीत आणि लडखळीत झालेल्या मार्गासाठी जिल्ह्यातील तसेच बाहेर ठिकाणांहून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागू नये यासाठी. नवीन निविदा मंजूर करीत आरमोरी ते गडचिरोली डांबरीकरण मार्गाच्या नूतनीकरणासाठी ८ कोटी मंजूर केले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग भंडारा-देसाईगंज ते गडचिरोली जिल्ह्यापर्यंत जोडल्या गेलेला आहे. सध्या स्थितीत देसाईगंज-कुरखेडा, देसाईगंज – लाखांदूर, देसाईगंज-ब्रम्हपुरी मुख्य डांबरीकरण मार्ग सुकर झाल्याचे दिसून येत आहे. अशातच आरमोरी ते गडचिरोली मार्गावर दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे सदर मार्गांवर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. खड्डे चुकवतांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
अशा खड्ड्यांची डागडुजी केल्यास परत पुन्हा तीच अवस्था होऊ शकते; ही बाब आमदार कृष्णा गजबे यांच्या लक्षात येताच त्यांनी डाग- डुजीला प्राधान्य न देता सरळ-सरळ नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला; त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग आरमोरी ते गडचिरोली पर्यंत जाणाऱ्या मुख्य डांबरीकरण मार्गासाठी ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून पोर्ला गावापासून कामासही सुरुवात करण्यात आली आहे. सदर कामामुळे वाहनधारकांचा मार्ग अधिक सुकर होणार आहे.
Discussion about this post