फुलंब्री प्रतिनिधी अमोल कोलते
औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील जानेफळ ममुराबाद शेलगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील धांड नदीवरील पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून या नदी वर लहान पुल आहे या पुलावरून पावसाचा पाणी वाहून जाते. दरवर्षी नदीला पूर येतो नदी भरून जाते नदीच्या दोन्ही बाजूने पाणी वाहून जातो गेल्या 20 25 वर्षापासून या पुलाची उंची वाढवावी अशी सतत मागणी केली जात आहेत परंतु खुलताबाद चे तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम अधिकारी व औरंगाबाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना यांनी या कामाकडे दुर्लक्ष केले आहे.
दरवर्षी पाऊस पडतो आणि या पावसाच्या पाण्याने या धांड नदीला पूर येतो आणि या पुरामुळे पुल वाहुन जाते.
यापूर्वी ग्रामस्थांनी संबंधित असलेले अधिक अधिकाऱ्यांना या मागणी केली आहे तरीपण हे शासकीय अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत .
या कामाच्या संदर्भात दैनिक आत्ताच एक्सप्रेस फुलंब्री तालुका प्रतिनिधी सरफराज पटेल यांनी संबंधित असलेले अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तर त्यांचा संपर्क होऊ शकला नाही तरीपण गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी केली जात आहेत तरीपण या शासनाने या समस्या संदर्भात स्थळ पाहणी करावी.
मागच्या आठवड्यामध्ये या नदीमध्ये दोन मुले वाहुन गेले होते.
तरीपण ते वाचले. त्यांची मोटरसायकल वाहून गेली.
गावाचे सरपंच व उपसरपंच यांनी या कामाकडे दुर्लक्ष केले असून असा आरोप ग्रामस्थ करत आहेत त्यांनी जर ही समस्या मांडण्याचा प्रयत्न केला असता तर पुलाची उंची वाढली असती. पुलाची उंची वाढल्यास कोणतीही घटना घडु शकत नाही.
पुढील प्रतिक्रिया..
खुलताबाद गंगापूर चे आमदार प्रशांत बंब यांनी आमच्या गावाच्या विकासासाठी दुर्लक्ष केले असून दर पाच वर्षांनी निवडणुका येतात , भरभरून मते घेतात आणि विकास कामे नाही करतात.
घाण नदीवरील फुलाची उंची वाढावी नसता आम्ही धरणे आंदोलन करू.
जावेद पटेल तंटामुक्त समिती अध्यक्ष जानेफळ शेलगाव ममुराबाद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष गंगापूर खुलताबाद
Discussion about this post