चामोर्शी :
तालुक्यातील मुरखळा चक या गावातील राजन्ना नल्लूरवार हे गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नाही मात्र गेल्या अनेक वर्षांपासून घरकुल मिळेल या आशेवर आपल्या कुडा मातीच्या घरात राहत असून त्यांना घरकुल द्यावे अशी मागणी आहे.
नल्लुरवार यांचे घर अतिवृष्टीमुळे घराची भिंत कोसळली मात्र सुदैवाने जीवित हानी टळली घरातील संसार उपयोगी साहित्य नासधूस झाले या घटनेचा पंचनामा करण्यात आला मात्र अजूनही आर्थिक मदत मिळू शकली नाही हे दुर्दैवच .
मानवाच्या मुलभूत गगरजापैकी एक असलेली निवारा ही गरज पूर्ण होऊ शकली नाही घरकुल मिळेल या आशेवर आपल्या जीर्णावस्थेत असलेल्या घरात राहून दिवस काढत आहे. शासनाकडून अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत असतात मात्र त्या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही त्यामुळे त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गाव पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत कार्य करीत असते .
गावातील राजकीय मतभेद यामुळे अनेक पात्र लाभार्थी या योजनेचा लाभ मिळत नाही याचे नल्लूरवार कुटुंब उदाहरण आहे.
Discussion about this post