हेरवाड/ स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानांतर्गत हेरवाड गावामध्ये विविध उपक्रम नागरिकांच्या सहकार्याने राबवले जात असून गणेशोत्सव पर्यावरण पूरक व प्लॅस्टिक मुक्तीचा सण म्हणून साजरा करण्याचे निर्देश हेरवाड ग्रामपंचायत ने दिले आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सव कालावधीत गणेश मूर्ती विसर्जनाकरिता कृत्रिम कुंड व कायली ची व्यवस्था हेरवाड ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.
माझी वसुंधरा अंतर्गत गणपतीला नदी विहिरीमध्ये न सोडता दान करण्याचे ग्रामपंचायतीने आव्हान केले आहे. मुर्त्या गावातच गोळा करायच्या आणि त्याला एखाद्या पडक्या विहिरीमध्ये किंवा खोदून त्यांना निर्जत करायच्या किंवा त्या दान करायच्या या उद्देशाने ग्रामपंचायत गेले दहा ते पंधरा वर्षे हा उपक्रम राबवत आहे आणि नागरिक पण त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत .
नागरिक नदी विहिरीमध्ये गणपती न सोडता ग्रामपंचायतला आणून देत आहेत त्यामुळे हा पर्यावरण पूरक गणेश उत्सव 2024 व्यवस्थित रित्या चालू आहे.
लोकांना प्रदूषणामुळे होणारे नुकसान समजत आहे. त्यामुळे नागरिकांचा या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळत आहे. अशी माहिती हेरवाड ग्रामपंचायतिचे क्लार्क सुरेश पाटील यांनी दिली. यावेळी हेरवाड ग्रामपंचायतिचे कर्मचारी व नागरिक उपस्थितीत होते.
Discussion about this post