दत्तवाड/ येथे दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली.
नूर कासीम काले(वय.49,रा.दत्तवाड)असे त्याचे नाव असून या गुंडाला बुधवारी रात्री पोलिसांनी अटक करून १ वर्षासाठी येरवडा जेलमध्ये स्थानबद्ध केले आहे.
कालेविरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.त्याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक सागर पवार यांनी सादर केला होता.
दरम्यान झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) आणखीन दोन प्रस्ताव प्रस्तावित आहेत.त्यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाले आहेत. दतवाड येथील नूर काले याची मोठी दहशत होती गर्दीत मारामारी,विनयभंग, जुगार यासह अवैद्य व्यवसायाची पंढरी त्याने निर्माण केली होती.
त्याच्या विरुद्ध कुरुंदवाड पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरुद्ध कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. कुरुंदवाड पोलिसांनी त्याच्यावर हद्दपारीचीही यापूर्वी कारवाई केली आहे. स.पो.नि फडणीस यांनी याबाबत प्रस्ताव तयार करून सादर करत कारवाईचा दणका दिला आहे.
Discussion about this post