
डहाणू, चांदवड पाटिलपाडा येथे दि.१२ सप्टेंबर रोजी चांदवड पाटीलपाडा येथे जि.प.शाळा येथे पोषण माह अभियान कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमात आरोहण सामाजिक संस्था आणि आय.सी.डी.एस विभागा अंतर्गत पार पडला.
प्रस्तावना : भारतातील कुपोषणाचा विचार करता अतिशय गंभीर अवस्था आहे, प्रत्येक दुसरे मुल हे कुपोषणाने ग्रस्त आहे. यावर मात करण्यासाठी शासनाने राष्ट्रीय पोषण अभियान २०१८ सुरू करून १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर असे पूर्ण महिनाभर संपूर्ण देशभरात पोषण विषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते.
व्हिडिओ च्या माध्यमातून कुपोषण म्हणजे काय ते सांगून धावताना लवकर थकणे, शाळेत शिकविण्यावर लक्ष न लागणे, सतत आजारी पडणे, विसर पडणे असे शॉर्ट व्हिडिओ दाखवून कुपोषणाची लक्षणे समजून सांगितली. त्यानंतर एकदा झाड सुकले की त्या नंतर काहीही केले तरी ते झाड जगू शकत नाही तसेच एकदा घडवलेले मडके बिघडले तर त्याचा आकार बदलू शकत नाही तशाच प्रकारे एकदा कुपोषण झाले की ईच्छा असूनही काही करता येत नाही हे समजून घेतले.शासनाने तर त्यांच्या पातळीवर कुपोषणावर मात करण्यासाठी सुरुवात केली पण आपण आपल्या गावपातळीवर काय काय करू शकतो त्यासाठी, शपथ किंवा प्रतिज्ञा घेणे गरजेचे आहे, नुसती प्रतिज्ञा च नाही तर काळजी घेतली पाहिजे आणि नुसती काळजीच नाही तर तशी वैयक्तिक पातळीवर तसेच सामाजिक पातळीवर कृती कशी करावी हे व्हिडिओ द्वारे समजून घेतले. राष्ट्रीय पोषण अभियानातून आपण काय करावे तर महत्त्वाच्या ५ गोष्टी, १) बाळाचे पाहिले १००० दिवस २) डायरीया आणि ओ.आर.एस ३) पूरक पोषण आहार ४) लोहयुक्त गोळ्यांचे सेवन ५) स्वच्छ पाणी आणि स्वच्छ पर्यावरण यांवर भर देणे जरुरी आहे, याविषयी व्हिडिओ दाखवून त्यानुसार आपली प्रत्येक कृती असावी तसेच आपल्या घरात, समाजात आणि गावपातळीवर बदल घडवून आणण्यासाठी आपण प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे. तसेच वरील सर्व माहिती प्रकल्प अधिकारी सूर्यकांत गावित यांनी दिली व अजून जास्तीत जास्त महसूल गावांना उपक्रम घेवू असे सांगितले.
अंगणवाडी सेविका ताई सुवर्णा कोल्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या आणून त्यांचे पौष्टीक गुणधर्म आणि आहारातील महत्त्व यांविषयी अंगणवाडी ताईंनी माहिती दिली.व पौष्टिक आहार, आहारातून मिळणारे पौष्टीक घटक आणि जीवनसत्वे तसेच त्यांचे शरीरातील महत्त्व यांविषयी माहिती देऊन कार्यक्रमाचा समारोप केला.
सदर कार्यक्रमात उपस्थित लोकनियुक्त सरपंच जितेंद्र दळवी, आरोहण संस्थेचे प्रकल्प अधिकारी सूर्यकांत गावित, तसेच संस्थेचे कार्यकर्ते सोनाली माढा, भारती गोविंद, अंगणवाडी सेविका कलू कोठारी, मंगला ताई, लता धिंडे उपस्थित होत्या.

Discussion about this post